शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

साताऱ्याचा उमेदवार योग्य वेळी जाहीर : चंद्रकांत पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2018 23:39 IST

सातारा : ‘सातारा-जावळी मतदारसंघातून भाजपचा मीच उमेदवार, असे दीपक पवारांनी काही दिवसांपूर्वी जाहीर केले असले तरी मात्र ही उमेदवारी कोणाला द्यायची, हे योग्य वेळ आल्यानंतर जाहीर केले जाईल,’ असे

ठळक मुद्देकेवळ संपर्क कार्यालय सुरू करून मते मिळणार नाहीत; संदिग्ध विधानामुळे चर्चा

सातारा : ‘सातारा-जावळी मतदारसंघातून भाजपचा मीच उमेदवार, असे दीपक पवारांनी काही दिवसांपूर्वी जाहीर केले असले तरी मात्र ही उमेदवारी कोणाला द्यायची, हे योग्य वेळ आल्यानंतर जाहीर केले जाईल,’ असे संदिग्ध विधान महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केल्याने भाजपचे कार्यकर्ते भलत्याच गोंधळात पडले आहेत.

सातारा-जावळी विधानसभा मतदारसंघाच्या जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी माधव भंडारी, रवींद्र अनासपुरे, सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर, जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, जावळीचे नेते दीपक पवार, मनोज घोरपडे, प्रभाकर साबळे, धनंजय जांभळे, मिलिंद काकडे, महेश शिंदे, प्राची शहाणे, विजय काटवटे, अमित कुलकर्णी, आप्पा कोरे आदी उपस्थित होते.

चंद्रकांत पाटील पुढे म्हणाले, ‘सातारा-जावळीतील जनता शिवेंद्रसिंहराजेच्या विरोधात जनता मतदान करेल, असे नाही. साताºयाची विधानसभेची जागा भाजपला जिंकायची आहे. सातारा-जावळी मतदारसंघाचा उमेदवार कोण दीपक पवार की, अन्य कोण? हे योग्य वेळी पक्ष जाहीर करेल.’

साताºयात जनसंपर्क कार्यालय सुरू करून मते मिळणार नाहीत. कोल्हापूर जिल्ह्यात भाजपने गरीब जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी सामाजिक उपक्रम हाती घेतले आहेत. तसे उपक्रम साताºयात सुरू केले पाहिजेत तरच जनता भाजपच्या पाठीशी राहील. जनसंपर्क कार्यालय २४ तास सुरू राहिले पाहिजे. मी येता-जाताना अचानकपणे भेट देईन. त्यावेळी जर जनसंपर्क कार्यालय बंद दिसले तर मग उमेदवारी बाबतीत विचार करावा लागेल, असा टोला कोणाचेही नाव न घेता लगावला.मराठा आरक्षणासाठी न्यायालयीन लढामराठा समाजाला आरक्षण मिळावे, ही सरकारची इच्छा आहे. यासाठी सरकारने मागासवर्गीय आयोग नेमला होता. येत्या काही दिवसांत आयोग आपला अहवाल न्यायालयात सादर करेल, त्यानंतर आवश्यक ती कायदेशीर लढाई सरकार ताकदीने लढेल, असे आश्वासक विधानही मंत्री पाटील यांनी केले.धनंजय जांभळे यांच्या कामाचे कौतुकभाजपमधील अंतर्गत वादामुळे गटनेतेपदाचा राजीनामा द्यावे लागलेल्या नगरसेवक धनंजय जांभळे यांच्या कामाचे चंद्रकांत पाटील यांनी कौतुक केले. जांभळे यांनी गेल्या दीड वर्षात शहरात चांगले काम केले असल्याचे उद्गारही त्यांनी काढले.सातारा येथे भाजपच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शेखर चरेगावकर, विक्रम पावसकर, मनोज घोरपडे, धनंजय जांभळे, दीपक पवार उपस्थित होते.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरPoliticsराजकारणchandrakant patilचंद्रकांत पाटील